संगणक अभियंत्यांचे पसायदान

आता विश्वात्मके देवे ।येणे संगणक ज्ञाने तोषावे ।
तोषोनी आम्हा द्यावे । नोकरीदान हे ।।

जे बेरोजगार त्यास नोकरी लागो । त्यांना घसघशीत पगारवाढ लाभो ।
बॉसची त्यांवरी राहो । अभूतपूर्व प्रीती ।।

मालकशाही निघून जावो । कामगारांचे राज्य येवो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । कामगार समाज हा ।।

सकळ कामगार मंडळी । संगणक अभियंत्यांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटत राहो ।।

चला कंपनी मध्ये जाऊ । टाईम पास करून येऊ ।
व्यवस्थापक लोकांना दाखवुं । कधीच न केलेले काम ।।

कामचुकारपणा हे ज्यांचे लक्षण । deliveries उशीर हे ज्यांचे भूषण ।
ते समस्त कामगार जन । सोयरे होतु।।

किंबहुना आंतरजाली (Internet) । पडून राहू  तिन्ही काळी ।
सदैव कळफलक आदळी । खटा खटा ।।

आणि गुगल च्या कृपाशिर्वादाने । सदैव कोड copy -paste करणे ।
R&D केली म्हणून सांगणे । पचून जावे जी ।।

येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणे वरे कामगार सर्व । सुखिया झाले ।।

Leave a comment